सातारा : पडळच्या माण-खटाव ॲग्रो प्रोसेसिंगतर्फे ऊस तोडणी, वाहतूक करार, यंदा ७ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट

मायणी : पडळ (ता. खटाव) येथे खटाव-माण तालुका ॲग्रो प्रोसेसिंग प्रा. लि. साखर कारखान्यातर्फे ऊसतोडणी व वाहतुकीचे करारपत्राचे वाटप करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष प्रभाकर घार्गे, सहअध्यक्ष आमदार मनोज घोरपडे, संचालक संग्राम घोरपडे, संचालक कृष्णात शेडगे, महेश घार्गे, तांत्रिक संचालक सनी क्षीरसागर, सरव्यवस्थापक काकासाहेब महाडिक, शेती अधिकारी किरण पवार, मुख्य लेखापाल अजित मोरे, मुख्य रसायनशास्त्रज्ञ गोरख कदम, डिस्टिलरी व्यवस्थापक नितीन शितोळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रभाकर घार्गे यांनी आगामी गाळप हंगामात सात लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त उसाचे गाळप केले जाईल असा विश्वास व्यक्त केला. कारखान्याचे नेटके नियोजन केल्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. दुष्काळी भागातील साखर कारखाना प्रगतीच्या वाटेवर असल्याचे यांनी सांगितले.

कारखान्याचे सहअध्यक्ष आमदार मनोज घोरपडे यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी तोडणी कामगार व वाहतूकदार संघटना, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत लावलेल्या रोपट्यास आज चांगली फळे आली आहेत. योग्य नियोजन व कामगारांचे परिश्रमामुळे कारखान्याची प्रगती होत आहे. या वेळी ऊस तोडणी, वाहतुकीचे करार करण्यात आले. पांडुरंग मिसाळ, प्रकाश काळे, प्रकाश खाडे, भाऊ पांढरे, पांडुरंग खरात, भीमाण्णा बरकडे आदींनी वाहतुकीचा करार केला. त्याचे पूजन करण्यात आले. यावेळी शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यालयीन अध्यक्ष मल्हारी नाकाडेंनी सूत्रसंचालन केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here