सातारा : थकीत एफआरपीसाठी रयत क्रांती संघटना आक्रमक, तीन कारखान्यांना निवेदन

सातारा : ऊस नियंत्रण कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस गाळप झाल्यापासून चौदा दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांतील शेतकऱ्यांची ऊसबिले अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तातडीने ऊस बिले न दिल्यास आंदोलन केले जाईल असा इशारा रयत क्रांती संघटनेने दिला आहे. याबाबत वर्धन ॲग्रो त्रिमली, ओमकार शुगर रायगाव व शिवनेरी शुगर या तीन कारखान्यांना संघटनेच्यावतीने निवेदने देण्यात आली.

संघटनेने म्हटले आहे की, जिल्ह्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांना वेळेवर ऊसबिल अदा करत नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. कारखान्यांनी तातडीने बिले द्यावी अन्यथा साखर कारखान्यांना साखरेच्या पोत्यावर बँका कर्ज देतात. ते पैसे कुठे गेले? याचाही शोध घ्यावा लागेल. त्वरित ऊसबिल न दिल्यास साखर कारखाना स्थळावर रयत क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला. ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलवडे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, नितीन कुलकर्णी, सौरभ चव्हाण, सुहास पिसाळ यांनी कारखान्यांच्या प्रशासनाला निवेदन दिले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here