सातारा : कोरेगाव तालुक्यात साडेबावीस लाख टन ऊस उत्पादन शक्य – आ. महेश शिंदे यांना विश्वास

सातारा : जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेच्या भाडळे उपसा जलसिंचन योजना, नलवडेवाडी उपसा जलसिंचन योजना यांसह विविध कामांचा शुभारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार महेश शिंदे यांनी, आगामी १३ महिन्यात भाडळे व चैत नलवडेवाडी उपसा जलसिंचन योजना पूर्ण होतील. त्यातून साधारणतः साडेबावीस लाख टन उसाचे उत्पादन घेता येईल. तालुका शंभर टक्के सिंचनाखाली येईल, तालुक्यातील हा शेवटचा दुष्काळ आहे, असे ठाम विश्वास व्यक्त केला. उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजनावेळी श्रीफळ वाढवताच पावसाने हजेरी लावली. याचा उल्लेख करत आमदार रवींद्र चव्हाण आणि आमदार महेश शिंदे यांनी आनंद व्यक्त करत योजना वेळेत पूर्ण होण्याचा विश्वास व्यक्त केला.

आ. महेश शिंदे म्हणाले, जिहे कठापूर योजनेचे ७० टक्के पाणी आपल्याला मिळाले आहे. आजपर्यंत तालुक्याला हक्काचे पाणी नव्हते, मात्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष झाल्यानंतर कृष्णा खोऱ्यातील पाण्याचा फेर आढावा घेतला आणि तब्बल दोन टीएमसी पाणी मिळवले. आजवर धरणे झाली. जिल्ह्यात, पुनर्वसन झाले. कोरेगाव तालुक्यात, मात्र २२ पुनर्वसीत गावांना पाणी नव्हते, त्यांना पाणी देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करु शकलो, याचा आनंद आहे. कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, आ. धैर्यशील कदम, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रिया शिंदे, भाजपचे प्रदेश संघटनमंत्री मकरंद देशपांडे, विक्रम पावस्कर, रामकृष्ण वेताळ, सोळशी येथील सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य नंदगिरी महाराज आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रिया शिंदे यांचेे भाषण झाले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here