सोलापूर : ‘सहकार शिरोमणी’-‘ओंकार शुगर’मध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

सोलापूर : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखाना उभारणी आणि नावारुपास आणण्यात कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. मागील २० ते ३८ वर्षे प्रामाणिकपणे सेवा करून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा गौरव करणे एक कटुंबप्रमुख म्हणून संचालक मंडळाची जबाबदारी आहे. कर्मचारी सेवानिवृत्त झाले असले तरीही यापुढे त्यांच्या पाठीशी संस्था उभी राहील, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केले. सहकार शिरोमणी सहयोगी ‘ओंकार शुगर कार्पोरेशन प्रा.लि.’ कारखान्याच्या सेवेतून निवृत्त झालेल्या १८ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात चेअरमन काळे आणि व्हा. चेअरमन भारत कोळेकर यांच्या हस्ते निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात सेवानिवृत्त प्र. कार्यकारी संचालक पी.डी. घोगरे, गौतम गुंड, शिवमुर्ती पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. आपल्या सेवा कालावधीत सर्वांचे सहकार्य लाभल्याबद्दल त्यांनी आभार मानले. सेवानिवत्त आबासो मासाळ, विलास लिंगे, चंद्रकांत बोधे, ज्ञानेश्वर कौलगे, नेताजी डूबल, मधुकर गायकवाड, विष्णू खवणकर, भारत पोरे, तुकाराम हाके, बाळासाहेब ताटे, प्रकाश शिंगटे, शामराव गोडसे, श्रीधर रणवरे, हनुमंत काळे यांचा सत्कार करण्यात आला. कामगार संघटनेचे अध्यक्ष बंडू पवार आणि सेक्रेटरी दशरथ लामकाने यांनी सूत्रसंचालन केले. चिफ अकौंटंट बबन सोनावले, मुख्य शेती अधिकारी प्रतापराव थोरात आदींसह अधिकारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here