सोलापूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर बायो सीएनजी प्रकल्पाचे पूजन

सोलापूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि., वेणुनगर गुरसाळे येथे चेअरमन, आमदार अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक्स.ई.एम.एक्स. प्रोजेक्टस् प्रा.लि.(हैद्राबाद) या कंपनीमार्फत बायो सी.एन.जी. प्रकल्पाची उभारणी करण्यात आलेली आहे. १० मार्च रोजी सकाळी ७ वाजता होम हवन पूजन कंपनीचे व्यवस्थापक हिमादिप, मनिषा नल्लावडला व कारखाना संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या प्रकल्पामुळे परिसरातील ग्राहकांना वेळेत गॅस उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक संभाजी भोसले, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, कालीदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, दशरथ जाधव, अशोक तोंडले, अशोक घाडगे, सचिन पाटील, धनाजी खरात, विठ्ठल रणदिवे, अॅड. नितीन खटके, विठ्ठल पाटील, कार्यकारी संचालक आर.बी. पाटील तसेच कंपनीचे पटनम महेंद्र रेड्डी, श्रीराम यरलागड्डा, हरिश्चंद्र यरलागड्डा, रमना रेड्डी, हरिष केथीरेड्डी, श्रीनिवास कासुला, नितीन देशपांडे, एस.जे. मलीक व कारखान्याचे चिफ केमिस्ट माने, डिस्टलरी मॅनेजर सोळंकी, एस.एस.ओ. महेश पाटील, नागटिळक, कोळेकर आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here