इथेनॉलसाठी अनुदानीत तांदूळ मिळत नसल्याने अडचणी वाढल्या : मीडिया रिपोर्ट

नवी दिल्ली : इथेनॉल उत्पादन करणाऱ्या जवळपास १०० डिस्टिलरी संकटात आहेत, असे वृत्त द टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. कारण, भारतीय अन्न महामंडळाकडून (FCI) त्यांचा एका आठवड्यापासून अनुदानित तांदूळ (subsidised rice) पुरवठा बंद केला आहे. केंद्र सरकार FCI कडून अतिरिक्त तांदूळ पुरवठ्याचा आढावा घेण्यात येत आहे.

केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात गैर बासमती सफेद तांदळाच्या निर्यातीवर तत्काळ प्रभावाने निर्बंध घातले आहेत. सरकारने या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले, निर्यात निर्बंध लागू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे महागाईवर नियंत्रण आणणे आणि देशांतर्गत बाजारपेठेत पुरेशी उपलब्धता निश्चित करणे असा आहे. आतापर्यंत सरकार इथेनॉल उत्पादनासाठी एफसीआयकडे असलेल्या केंद्रीय साठ्यातून २००० रुपये प्रती क्विंटल दराने नॉन-फोर्टिफाइड तांदूळ पुरवठा करीत होते.

द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशनचे महासचिव व्ही. एन. रैना यांनी सांगितले की, आम्ही हा मुद्दा एफसीआयसोबत उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, FCI ने आम्हाला एका आठवड्यापासून अधिक काळ तांदूळ उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे आम्ही एका संकटाचा सामना करीत आहोत. आणि अनेक लोक इथेनॉल उत्पादन बंद करण्याच्या निर्णयाप्रत आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here