नवी दिल्ली : साखर उद्योगांची संघटना असलेल्या भारतीय साखर कारखाना संघाचे (इस्मा) महासंचालक अविनाश वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
याबाबत संघटनेने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अविनाश वर्मा यांनी २७ एप्रिल २०२२ रोजी इस्माच्या महासंचालक पदाचा राजीनामा दिली आहे. उद्योग संघटनेने त्यांचा राजीनामा स्वीकार केला आहे.
इस्मा ही देशातील साखर उद्योगातील प्रमुख संघटना आहे. १९३२ मध्ये स्थापन झालेली देशातील ही सर्वात जुनी औद्योगिक संघटना आहे.