साखरेचे मूल्यांकन दर प्रतिक्विंटल ४,७५० रुपये करण्याची साखर संघाची राज्य सहकारी बँकेकडे मागणी

कोल्हापूर : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची रास्त व किफायतशीर किंमत (एफआरपी) अदा करणे सुलभ व्हावे, यासाठी मालतारणातील खुल्या साखरेचे मूल्यांकन दर प्रतिक्विंटल ४,७५० रुपये निश्चित करावेत, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे केली आहे.

यासंदर्भात साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी २० नोव्हेंबर २०२६ रोजी बँकेला पत्र पाठवून मूल्यांकन दरात तातडीने सुधारणा करण्याची विनंती केली आहे. मागील तीन महिन्यांतील साखरेचे सरासरी बाजारमूल्य विचारात घेऊन मूल्यांकन दर ४,७५० रुपये प्रतिक्विंटल करण्याची मागणी करण्यात आली.सद्यस्थितीत साखरेच्या मूल्यांकन दरात अपेक्षित सुधारणा न झाल्यामुळे साखर कारखान्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी पूर्णपणे अदा करणे कारखान्यांना अत्यंत कठीण होत असल्याचे साखर संघाने पत्रात नमूद केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

दरम्यान, एफआरपीच्या प्रश्नावर राज्यातील विविध शेतकरी संघटनांकडून आंदोलने सुरू असून, यामुळे साखर उद्योगासमोरील परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. या पार्श्वभूमीवर साखरेच्या सध्याच्या बाजारमूल्याचा विचार करून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने साखरेचे मूल्यांकन दर तातडीने ४,७५० रुपये प्रतिक्विंटल निश्चित करावा, अशी आग्रही मागणी साखर संघाने केली आहे.या निर्णयामुळे साखर कारखान्यांना आर्थिक तरलता उपलब्ध होऊन शेतकऱ्यांची एफआरपी अदा करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा साखर उद्योगातून व्यक्त होत आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here