साखरेच्या किमती उसाच्या किमतीशी निगडीत असाव्यात: ईस्मा

इस्मानुसार केंद्र सरकार जाहीर करत असलेली साखरेची किमान आधारभूत किंमत उसाच्या एफआरपी वरून ठरवली पाहिजे.

केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या नवीन ठरवावर बोलताना इस्मा ने असे जाहीर केले.

ह्या वर्षी उसाची किमत ९.५% रिकवरी साठी २५५० प्रती टन जाहीर झाली. १०.८ रिकवरीला २९०० र. प्रती टन दर मिळतो. कारखान्यांना बाजारात ३५०० रु प्रती टन साखर विकली तर उत्पादकांना हा दर द्यायला परवडते, असे इस्माने पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे.

शेतकऱ्यांची २२००० कोटी रु ची थकबाकी कारखान्यांकडे आहे. अतिरिक्त उत्पादनामुळे साखरेच्या किमती घसरल्या असून कारखाने अडचणीत आले आहेत. साखरेचे बाजारातील दर २६०० रु असून उत्पादन खर्च ३५०० रु आहे.

कारखानदारांची मागणी साखरेच्या किमतीच्या ७५% उसाची किमत असावी अशी मागणी आहे. अशी पद्धत महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये सुरु आहे.

अशा पद्धतीचा तर्क वापरून केंद्राने साखरेचा दर ठरवावा अशी मागणी संघटनेने केली आहे.

याबरोबरच केंद्राने साखरेचे दोन दर निश्चित केले पाहिजेत. उत्तरेकडे एम ग्रेड ची साखर तयार होते आणि दक्षिणेकडे एस ग्रेड ची साखर तयार होते व या दोन्हीना वेगळा दर असावा असे इस्मा चे म्हणणे आहे.

ह्या निवेदनाचा विचार करून नवीन पद्धत जाहीर करावी व त्यात कायदा उल्लंघन करनार्याला कडक शासन करण्याची तरतूद असावी असे म्हंटले आहे.

SOURCEThe Hindu Business Line

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here