प्रवरानगर येथे ऊस तोड मजुरांच्या मुलांच्या साखर शाळेचा समारोप

अहमदनगर : लोकनेते पद्मभुषण डॉ. विखे पाटील प्रवरा शिक्षण संस्थेच्या येथील प्रवरा ग्रामीण शिक्षणशास्त्र विभागामार्फत प्रवरा साखर कारखाना परिसरात सुरू असलेल्या साखर शाळेचा समारोप झाला. बी.एड. च्या विद्यार्थ्यांनी प्रवरानगर परिसरात ऊस तोड मजुरांच्या मुलांसाठी साखर शाळेचा उपक्रम राबविला. साखर शाळा उपक्रमाचे समन्वयक डॉ. सचिन भोसले व प्रा. नयना औताडे यांनी उपक्रम यशस्वी पार पडला. साखर शाळेत सहभागी बी.एड. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तर लहान मुलांना खाऊ वाटण्यात आला.

यावेळी विखे साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील म्हणाले की, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पा व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहचविण्याचे पाहिलेले स्वप्न साखर शाळेच्या माध्यमातून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होत असल्याचा आनंद वाटतो. यासाठी शिक्षण शास्त्र महाविद्यालयांचा उपक्रम दिशादर्शक आहे. तर विद्यार्थ्यांनी ऊस तोड मजुरांच्या मुलांमध्ये लेखन-वाचन क्षमता निर्माण केल्या, असे प्राचार्या डॉ. विद्या वाजे यांनी सांगितले. वृषाली सुलताने, भारती तांबे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. रेणुका गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. नयना औताडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here