हजारो एकर ऊस पीकाला लागला कॅन्सर, शेतकर्‍यांना धक्का

पीलीभीत: पीलीभीत जिल्ह्यात हजारो एकर ऊसाचे पीक वाळून चालले आहे. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना मोठा धक्का बसला आहे. कृषीतज्ञ या प्रकाराला ऊसाचा कॅन्सर असल्याचे सांगत आहेत. यामुळे हजारो एकर पीक खराब होण्याच्या मार्गावर आहे. कोणताही इलाज नसणार्‍या या रोगामुळे शेतकर्‍यांचे फार मोठे नुकसान होण्याची शंका वर्तवली जात आहे.  पीलीभीत जिल्ह्याची यूपीतील ऊस उत्पादनाचा प्रमुख जिल्हा म्हणून ओळख आहे. पण आता या रोगामुळे एक नवे संकट ऊस पीकासमोर उभे आहे.

या कैन्सरमुळे पीकाच्या मुळाजवळ लाल रंगाचा फंगस आला आहे. ज्यामुळे ऊस वाळत आहे. या रोगामुळे हजारो एकर पीक उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. खास करुन बीसलपूर तहसील येथील परिसरात याचा प्रकोप सर्वात अधिक पाहण्यास मिळत आहे. शेतकरी अमित सिंह चौहान म्हणाले, पीकात लाल रंगाचा फंगस लागतो, ज्यामुळे पीक वाळते. याबाबत अधिकार्‍यांकडे तक्रारही केली आहे.  ऊस अधिकारी जितेंद्र मिश्रा यांनी बीसलपूर येथील शेतकर्‍यांच्या ऊस पीक़ाचे निरीक्षण केले. ते म्हणाले, हा रेड डॉट नावाचा रोग आहे. याला ऊसावर पडलेला कॅन्सर म्हणतात. या रोगावर उपाय नाही. या रोगाला पसरु नये म्हणून उपाय करता येतात.

या रोगाने संक्रमित असणारं एखादं पीक दिसलं तर शेतकर्‍यानी ते ताबडतोब नष्ट करणं गरजेचं आहे. अन्यथा हा रोग लगेच पसरतो. ते म्हणाले, आपल्यासाठी जिरो 238 प्रजाति सगळ्यात चांगली होंती, पण याच जातीत हा रोग अधिक प्रमाणात पहायला मिळत आहे. ऊस निरीक्षकांच्या मतानुसार, हा रोग मूळापासून वरती पसरतो. याला अल्कोहोल प्रमाणे दुर्गंधी असते.  पीलीभीत जिल्ह्यात ऊसाच्या पिकात हा रोग पहाण्यास मिळत आहे. एक वर्षानंतर पीक पूर्णपणे कापणीसाठी तयार होते. एक महिन्यानंतर पीकाची कापणी होणार आहे, पण या रोगामुळे ऊस पीकाचे आणि शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here