ऊसाचे पैसे देण्यास विलंब झाल्यामुळे उस शेतकर्‍यांनी बोलावली महापंचायत

208

अंबाला (हरियाणा) : नारायणगड साखर कारखान्याकडून दरवर्षी उसाचे पैसे मिळण्यास विलंब होतो, यामुळे नाराज झालेल्या उस शेतकर्‍यांनी 12 फेब्रुवारीला महापंचायतीचे बोलावली आहे. यामध्ये पुढील आंदोलनाची रूपरेखा ठरवण्यात येईल. गेल्या वर्षीही शेतकर्‍यांना आपले पैसे मिळवण्यासाठी अनेकदा आंदोलन करावे लागले आहे.

भारतीय किसान यूनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह यांनी सांगितले की, कारखान्याचे पर्यवेक्षण आणि कुठल्याही अनियमितता यातून वाचण्यासाठी अंबाला तील डेप्यूटी कमिश्‍नर यांना चेअरमन तर हरको बँकेच्या एमडी यांना निदेशक (वित्त) बनवण्यात आले होते. पण याचा काहीच फायदा झाला नाही. शेतकर्‍यांनी आपल्या पैशांसाठी किती वाट पहायची. साखरेच्या कमी किमतींमुळे साखर कारखाने योग्य वेळी शेतकर्‍यांना पैसे देवू शकले नाहीत. त्यांच्यानुसार, साखरेची किंमत 3,600 रुपये प्रति क्विंटल असायला हवी, जी सध्या कमी आहे. बीकेयू चे प्रवक्ता म्हणाले, या हंगामात 2 फेब्रुवारीपर्यंत शेतकर्‍यांनी 28 लाख क्विंटल उस पुरवठा केला आहे, ज्याचे 58 करोड रुपये कारखान्यांकडून देय आहे. नारायणगड साखर कारखान्यात 12 नोव्हेंबरला गाळप हंगाम सुरु झाला. उसाच्या खरेदीनंतर 14 दिवसांच्या आत पैसे देणे आवश्यक होते. पण कारखान्याने केवळ 13 डिसेंबर पर्यंतच्या बिलांनाच मंजूरी दिली आहे.

नारायणगड चे सब डिविजनल मजिस्ट्रेट (एसडीएम) आदिती यांनी हे पैसे लवकरच भागवले जातील असे सांगून, साखर विकण्यात येणार्‍या अडचणींमुळे पैसे भागवण्यास वेळ झाल्याचे सांगितले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here