तामिळनाडू कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांना लाल मिरची पिकवण्याचा सल्ला

कोईम्बतूर: तामिळनाडू कृषी विद्यापीठाने (TNAU) शेतकऱ्यांना सनम जातीच्या लाल मिरचीची पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. सनम जातीच्या या मिरचीची फार्म-गेट किंमत सुमारे ₹200-210 प्रति किलो असेल. ही किंमत गेल्या वर्षीच्या ₹175-180 च्या पातळीपेक्षा जास्त आहे. तथापि, मान्सून आणि इतर मिरची उत्पादक राज्यांकडून होणारी आवक यावर अवलंबून किंमत बदलू शकते.

 

मिरची हा भारतातील महत्त्वाचा आणि सर्वाधिक लागवड केलेला मसाला आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पहिल्या अंदाजानुसार देशात लाल मिरचीचे लागवडीखालील क्षेत्र 8.52 लाख हेक्टर आहे आणि त्यातून 19.58 लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात आणि तामिळनाडू ही प्रमुख मिरची उत्पादक राज्ये आहेत, जे देशातील एकूण मिरची उत्पादनात 93 टक्के योगदान देतात.

 

मिरची सामान्यतः तीन प्रकारात वापरली जाते. त्यात ताजी हिरवी मिरची, लाल मिरची पावडर आणि कच्ची लाल मिरची. भारतीय मिरचीला तीच्या आकर्षक रंगामुळे आणि चवीमुळे खूप मागणी आहे आणि मुख्यत्वे चीन, श्रीलंका, मलेशिया, बांगलादेश, सिंगापूर, थायलंड आणि UAE यासह विविध आशियाई देशांमध्ये निर्यात केली जाते.2022-23 मध्ये, तामिळनाडूमध्ये 0.49 लाख हेक्टरमधून 0.22 लाख टन सुक्या/लाल मिरचीचे उत्पादन झाले. तामिळनाडूमध्ये मुंडू आणि सनम या मिरचीच्या प्रमुख जाती आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here