तामीळनाडू : थिरुमंदांकुडी साखर काखरन्याचा प्रश्न सोडविण्याची सरकारकडे मागणी

चेन्नई : थिरुमंदांकुडी खासगी साखर कारखान्याच्या प्रश्नात हस्तक्षेप करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) पुरस्कृत तामिळनाडू विवासायगल संगमने तामिळनाडू सरकारकडे केली आहे. आंदोलन करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल अशी पद्धतीने या प्रश्नात तोडगा काढण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे.

असोसिएशनचे राज्य महासचिव सामी नटराडन यांनी एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, ऊस उत्पादक शेतकरी गेल्या १० दिवसांपासून कारखान्याच्या परिसरात आंदोलन करीत आहेत. साखर कारखान्याच्या यापूर्वीच्या व्यवस्थापनाकडून बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून शेतकऱ्यांवर टाकण्यात आलेल्या कर्जापासून मुक्ती द्यावी आणि ऊसाच्या थकीत रक्कमेची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. याबाबत यापूर्वी किलवेलुरचे आमदार नगई माली आणि असोसिएशनच्या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here