टांझानिया: किलोम्बरो शुइर्सकडून साखर उत्पादन दुप्पट करण्यासाठी गुंतवणूक

डोडोमा : देशातील सर्वात मोठी साखर उत्पादक कंपनी किलोम्बरो शुगर मीलने पुढील दोन वर्षांत आपले उत्पादन आणि उत्पादकांची क्षमता दुप्पट करण्यासाठी ५५० bn गुंतवणूक करण्याची योजना तयार केली आहे. इलोवो शुगर आफ्रिका आणि सरकारच्या स्वामित्वाखालील किलोम्बोरो शुगर्सने सांगितले की कारखान्याच्या विस्ताराचे काम सुरू झाले आहे. ऊस उत्पादकांच्या शेताची पाहणी पूर्ण झाली आहे. इलोवो आफ्रिकाचे विक्री प्रमुख एपैम मफरु यांनी सांगितले की, कारखान्याची उत्पादन क्षमता १,२५,००० टनावरुन २७०,००० टनांपर्यंत करण्यात येणार आहे. आम्ही देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे मफुरू यांनी सांगितले.

मफरु यांनी सांगितले की, बहुतांश शेतकरी चांगली खते आणि बियाणे यांचा वापर करत नाहीत. तर काही ठिकाणी अजिबात पाणी नसते. शेतकरी पावसावर अवलंबून आहेत. कारखान्याच्या विस्तारामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादन दोन्ही दुप्पट होईल. सध्या ५५०० शेतकरी कंपनीला ६,००,००० टन ऊस विक्री करतात. त्यांना ६५ अब्ज रुपये उत्पन्न मिळते. कारखान्याच्या विस्तारानंतर कर्मचारी २००० वरून ४४०० होणार आहेत. सरकार साखरेच्या अवैध आयातीवरही निर्बंध घालण्याचा प्रयत्न करीत आहे असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here