साखर कारखान्यात तांत्रिक बिघाड, ऊस तुटवड्यामुळे गाळप ठप्प

सितारगंज : दी किसान सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरळीत नसल्याचे दिसून येत आहे. दोन डिसेंबरपासून गाळप सुरू असले तरी विविध अडथळ्यांमुळे ४६ हजार क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले आहे. तर ३४ हजार क्विंटल ऊस बाजपूर व किच्छा साखर कारखान्याला पाठविण्यात आला आहे. आता पुन्हा कारखाना बंद पडला आहे. कारखान्यात झालेल्या बिघाडामुळे कारखाना सुरू राहत नसल्याने आर्थिक फटका बसत आहे.

२९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कारखान्याच्या गळीत हंगामाचे उद्घाटन केले. मात्र कारखाना तीन दिवस सुरू राहिला. गेल्या १२ दिवसांत कारखाना फक्त ४६ हजार क्विंटल ऊस गाळप करू शकला आहे. साखर उत्पादन अद्याप सुरूही झाले नव्हते. अशा वेळी मंगळवारपासून ऊस संपुष्टात आला. त्यामुळे कारखाना बंद पडला.

कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. के. सेठ यांनी सांगितले की, ऊस संपल्याने कारखाना बंद केला आहे. तर प्लांटमधील तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ आले आहेत. सेंटरकडून ऊस मागविण्यात आला आहे. पुरेसा ऊस मिळाल्यावर कारखाना सुरू केला जाईल. दरम्यान, कारखान्याने शेतकऱ्यांना एक लाख ४० हजार क्विंटलचे इंडेंट पाठवले आहे. त्यापैकी ८० हजार क्विटंल ऊस मिळाला आह असे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, सितारगंजचे जिल्हाधिकारी युगल किशोर पंत यांनी कारखान्याची पाहणी करून आढावा घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here