पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहीम गोताबाया राजपक्षे यांच्यात दूरध्वनीवरून संवाद

153

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहीम गोताबाया राजपक्षे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

उभय नेत्यांनी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मंचांमधील प्रासंगिक घडामोडी आणि दोन्ही देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या सहकार्याचा आढावा घेतला. सध्या भेडसावत असलेल्या कोविड-19 आव्हानांच्या संदर्भात दोन्ही देशातील अधिकाऱ्यांमध्ये नियमित संपर्क राखण्याचे उभय नेत्यांनी मान्य केले.

पंतप्रधानांनी भारताच्या शेजारी प्रथम (नेबरहुड फर्स्ट) धोरणात श्रीलंकेच्या महत्वाचा पुनरुच्चार केला.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here