दिल्ली, युपी, हरियाणात पावसानंतर वादळाचा अलर्ट जारी, थंडी वाढणार

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्ली, एनसीआरमध्ये रविवारी रात्रभर पाऊस कोसळला. त्यामुळे थंडी वाढली आहे. उत्तर प्रदेश, हरियाणातही गडगडाटासह पाऊस पाहायला मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साठले. उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी गाराही पडल्या. राजस्थानमध्ये पावसाने हाहाकार उडाल्याचे चित्र काही ठिकाणी होते. पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यादरम्यान भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज, सोमवारी दिल्ली, युपी, हरियाणासह उत्तर भारतातील राज्यांमध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल झाला आहे. उत्तर भारतात आज दिवसभर थांबून थांबून पाऊस कोसळू शकतो. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, हरियाणातील यमुनानगर, कोसली, सोहाना, रेवाड़ी, पलवल, बावल, नुंह, औरंगाबाद आणि युपीतील सहारनपूर, गंगोह, शामली, मुजफ्फरनगर, कांधला, खतौली आणि परिसरात आज हलका ते मध्यम पाऊस कोसळेल. तर चांदपूर, बडौत, दौराला, बागपत, मेरठ, खेकडा, मोदीनगर, किठौर, गढमुक्तेश्वर, पिलखुआ, हापुड, गुलौटी, सियाना, सिकंदराबाद, बुलंदशहर, जहांगीराबाद, अनूपशहर परिसरातही हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता आहे. दिल्ली -एनसीआरमध्ये पावसासह वादळाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतात ढगाळ हवामान राहील. दिल्लीत किमान १० तर कमाल २० डिग्री सेल्सिअस तापमान राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here