ऊस थकबाकी लवकर भागवण्याबाबत शेतकर्‍यांनी दिला इशारा

बाजपूर : सहकारी साखर कारखान्यावर देय असणारी शेतकर्‍यांची 56 करोड रुपये ऊस थकबाकी लवकर मिळावी, या मागणीचे निवेदन भारतीय किसान यूनियन च्या शेतकर्‍यांनी कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक यांना दिले. हा प्रश्‍न लवकरात लवकर सोडवला गेला नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

बुधवारी शेतकरी साखर कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये आले. जिथे पीएम प्रकाश चंद्र यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. त्यांचे म्हणणे होते की, साखर कारखान्याकडून विक्री केलेल्या साखरेपैकी 85 टक्के साखर शेतकर्‍यांची आहे आणि 15 टक्के कर्मचार्‍यांसाठी आहे. पण आमचे 85 टक्के पैसे कुठे गायब होतात याचा पत्ताच लागत नाही. शेतकर्‍यांना वेळेवर पैसे मिळत नाहीत, यामुळे ते खूप अडचणीत आहेत. त्यांनी ऊसाचे पूर्ण पैसे देणे, सोसायट्यांकडून पीक लावगडीसाठी खरेदी केले जाणारे खत, बिया, किटकनाशक आदीवर लावले जाणारे व्याज माफ करावे, प्रत्येक वर्षी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची सुरुवात 6 ते 10 नोव्हेंबर मध्ये करणे, बँक आणि सोयसाटी कडून घेण्यात आलेले कर्ज माफ करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी सुखदेव सिंह नरखेडा, राजेंद्र सिंह गिल, बिजेंद्र सिंह डोगरा, इंदरप्रीत सिंह सिद्धू, विक्रम कपूर अजीत सिंह पूनिया, जसवीर सिंह, परमजीतसिंह सिंह, त्रिलोचन सिंह, तेजपाल सिंह, अमृतपाल सिंह आदी उपस्थित होते. जीएम यांनी यावेळी शेतकर्‍यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्‍वासन दिले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here