उत्तर प्रदेश: सरकारच्या प्रयत्नांमुळे ऊस बिले मिळण्यास गती

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे देण्याबाबत राज्यात एक नवा विक्रम नोंदवला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार योगी आदित्यनाथ सरकार सत्तेवर आल्यानंतर १९ मार्च २०१७ पासून आजअखेर १.२२ लाख कोटी रुपयांचे वितरण शेतकऱ्यांना केले गेले आहे. गेल्या काही हंगामात ऊस बिले मिळण्यास गती आल्याचे दिसून आले आहे.

योगी सरकारच्या कार्यकाळात प्रति हेक्टर उसाचे उत्पादन आणि साखर कारखान्यांकडून केले जाणारे उसाचे गाळप याचाही विक्रम नोंदवला गेला आहे. यागी सरकार याआधीच्या सरकारच्या काळातील थकबाकीसह शेतकऱ्यांना सर्वाधिक ऊसाचे पैसे मिळवून देण्याबाबतही अग्रेसर राहीले आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्यासह साखर कारखान्यांचे आधुनिकीकरण आणि नव्या लोकांची नियुक्ती यावर सरकारने भर दिला आहे. साधारण २४ हून अधिक साखर कारखान्यांच्या गाळप क्षमतेत वाढ करण्यात आली आहे.

गोरखपूरमधील पिपराइच, बस्तीमधील मुंडेरा आणि बागपत जिल्ह्यातील रमाला येथे नव्याने साखर कारखाने सुरू करण्यात आले आहेत. नवे साखर कारखाने सुरू करणे आणि जुन्या कारखान्यांचे आधुनिकीकरण यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. यापूर्वी समाजवादी पक्ष आणि बहूजन समाज पार्टी यांच्या कार्यकाळात २००७ पासून २०१७ पर्यंत २९ साखर कारखाने बंद पडले होते. राज्य सरकारने स्थानिक स्तरावर ऊसाचे गाळप करण्यासाठी शंभर तासांत खांडसरी युनीट्सना ऑनलाइन लायसन्स देण्याची व्यवस्था केली आहे. आतापर्यंत १०५ युनीट्सना लायसन्स देण्यात आले असून त्यामुळे त्यांची गाळप क्षमता वाढवून २७ हजार ८५० टीडीएस केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here