सातारा : गुळाच्या दरात तब्बल १० रुपयांची वाढ, आता किलोला ६५ रुपये दर

सातारा : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत साखर, गुळासह विविध वस्तुंच्या दरात वाढ झाली आहे. गुळाचे दर प्रति किलो दहा रुपयांनी वाढले आहेत. गूळ आता ५५ रुपयांवरून ६५ रुपयांवर गेला आहे. साखरेच्या दरात पुन्हा किलोला ४ रुपयांनी वाढ झाली असून, साखरेचा दर आता ५४ ते ५५ रुपये झाला आहे. तर इतर किराणा मालाचे दर स्थिर आहेत. साखरेबरोबरच गूळ, खाद्यतेल आणि गव्हाच्या दरातील वाढीमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. श्रावण महिना सुरू झाल्याने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. त्याचा परिणामही दरावर झाल्याचे दिसून येते.

चालू सप्ताहात बहुतांश खाद्यपदार्थांचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. यात प्रामुख्याने साखर आणि गुळाचा समावेश आहे. गुळाचा दर यापूर्वी ५० ते ५५ रुपये होता. सणासुदीतील मागणी वाढल्याने त्यात दरवाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तर एल निनोमुळे पाऊस गायब असल्याने आगामी हंगामातील कमी ऊस उत्पादनाची शक्यता तसेच चालू हंगामाच्या अखेरीस कमी साखर साठा शिल्लक राहिल्याने साखरेचा दरही गतीने वाढत आहे. गेल्या महिनाभरापासून साखरेचा दर झपाट्याने वाढला.

ChiniMandi WhatsApp Channel

आता ५५ रुपये किलो दराने साखर मिळत आहे. तर खाद्यतेलाचा दर आता १८८ रुपयांवरून १२० ते १९२ रुपये किलो झाला आहे. गव्हाचा दर ४५ रुपयांवरून ४८ ते ५० रुपये किलो झाला आहे. शेंगदाण्याचा दर १५० रुपये किलो झाला आहे. शाळूचा दर ५ हजार २०० रुपये क्विंटल आहे. तर किलोचा दर आता ५८ रुपयांवरून ६० रुपये किलो झाला आहे. साबुदाण्याचा दरात किलोला ५ रुपयांनी वाढ झाली असून, दर आता ८० रुपयावरून ८६ रुपये झाला आहे. या सप्ताहात ड्रॅगन फ्रूट, विदेशी फळांची आवक वाढली आहे. ड्रॅगन फ्रूट १८० ते २०० रुपये किलो असून, काश्मीर सफरचंदाचा दर विदेशी सफरचंद २०० ते २५० रुपये किलो आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here