कर्नाटक: गुळाच्या किमतीत जबरदस्त वाढीमुळे शेतकरी खुश

म्हैसुर : गुळाच्या दरातील वाढीमुळे म्हैसूर आणि चामराजनगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खुशीचे वातावरण आहे. गाळपासाठी उसाची कमी उपलब्धता, कामगारांची समस्या आणि अवकाळी पावसामुळे गुळाच्या उत्पादनात घसरण झाली आहे. त्यामुळे या हंगामात गुळाचा दर जवळपास दुप्पट झाला आहे. गेल्या एक आठवड्यापासून ३ हजार रुपयांत विक्री केला जाणारा गूळ आता ५,५०० ते ६,००० रुपये दराने मिळत आहे.

म्हैसूर आणि चामराजनगर हे जिल्हे प्रमुख गुळ उत्पादकांपैकी एक आहेत. आणि या विभागातील हजारो शेतकरी ३३,००० हेक्टरमध्ये ऊस शेती करतात. शेतकरी फक्त साखर कारखान्यांनाच ऊस पुरवठा करीत नाही तर स्थानिक गुळ उत्पादक युनिटलाही ऊस पुरवठा करतात. दोन्ही जिल्ह्यात एकूण ५५० गुळ युनिट्स आहेत. येथील गुळाला तामिळनाडूसह मध्य प्रदेश, ओडिशा, गुजरात, महाराष्ट्र, केरळ आणि राजस्थानातील व्यापाऱ्यांकडून मागणी असते. मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे गेल्या १० दिवसांत गुळाचा दर १०० टक्के वाढला आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून यंदा एप्रिलपर्यंत गुळाची २,८०० ते ३,३०० रुपये प्रती क्विंटल दराने विक्री केली जात होती. मात्र, गेल्या आठवड्यात गुळाची मागणी वाढल्याने ५,५०० रुपये प्रती क्विंटल दराने विक्री केली जात आहे. पुढील आठवड्यापर्यंत हा दर ६,५०० रुपयांपर्यंत वाढू शकेल.

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना कृषी खात्याचे संयुक्त संचालक सी. एस. चंद्रशेखर म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून या विभागातील गुळ उत्पादनात मोठी घसरण झाली आहे. ते म्हणाले की, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याच्या आरोग्यदायी फायद्यामुळे गुळाची मागणी दरवर्षी वाढत आहे. चंद्रशेखर यांनी सांगितले की, गुळाच्या खपात वाढ आणि उत्पादनातील घट यामुळे दरवाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here