एअर इंडिया एक्सप्रेस च्या सर्व उड्डांणांवर 15 दिवसांसाठी दुबईचा प्रतिबंध

97

नवी दिल्ली: एयर इंडिया एक्सप्रेस च्या उड्डाणांवर दुबई मध्ये 15 दिवस म्हणजेच 2 ऑक्टोबरपर्यंत निर्बंध घातले आहेत. अलीकडेच जयपूर हून दुबईला जाणार्‍या एयर इंडिया एक्सप्रेसच्या विमानामध्ये एक प्रवासी कोरोनाग्रस्त आढळला होता. ज्यानंतर एयर इंडियाच्या सर्वच विमान सेवांवर निर्धारित वेळेपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत.

खर तर कोरोनाचा प्रकोप पाहता यूएई सरकारने या दिवसांमध्ये नियम कडक केले आहेत. अशामध्ये भारतातून प्रवास करणार्‍या प्रत्येक प्रवाशाला 96 तास आधी आपली आरटी पीसीआर टेस्ट करणे अनिवार्य आहे. याबरोबरच फ्लाइट च्या पूर्वी वैध निगेटेव्ह कोविड-19 टेस्ट रिपोर्ट वेबसाईटवर अपलोड करावी लागते.

याबरोबरच विमानातून दुबई मध्ये पोचलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार आणि क्वारंटाइन चा खर्चही एयर इंडिया एक्सप्रेसला करावा लागतो. तर दुबई साठी विमान उड्डाणे बहाल करणे आणि एयर इंडियाला अशा घटन पुन्हा न होवू देण्याकरता एक विस्तृत सुधारात्मक कारवाई करण्याचा आग्रह करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे देशभरामध्ये कोरोनाचा फैलाव सातत्याने होत आहे. भारतामध्ये 52,12,686 कोरोनाग्रस्त आहेत. तर 84,404 लोकांचा यामुळे मृत्यु जाला आहे. 41,09,828 लोक बरेही झाले आहेत. देशामद्ये कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा अधिक आहे. सध्या कोरोनाचे सक्रिय रुग्ण एकूण 10,17,717 आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here