कोल्हापूर : अथणी शुगर्स बांबवडे शाहूवाडी युनिटने प्रतिटन ३२०० रुपयाप्रमाणे नोव्हेंबर अखेरपर्यंतची सर्व ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील यांनी दिली. गळीत हंगामाचा प्रारंभ नोव्हेंबर महिन्यात झाला. गतवर्षी कारखान्याचे विस्तारीकरण केले असून, गाळप क्षमता २५०० मे. टन प्रतिदिनवरून ५५०० मे. टन प्रतिदिन केली आहे. या वर्षी कारखाना चालू होण्यास थोडा विलंब झाला तरी ३० दिवसांत ८८९३० मे. टन गाळप पूर्ण करत सरासरी साखर उतारा १०.२० टक्केने ८१५२० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. चालू गळीत हंगामास पावसामुळे थोडा विलंब झाला आहे. तरी ऊस पुरवठाधारक शेतकरी, तोडणी, ऊस वाहतूकदार यांनी गळीत हंगामात जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून उच्चांकी ६ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, युनिट हेड रवींद्र देशमुख, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी कंत्राटदार, वाहतूकदार उपस्थित होते.
Home Marathi Indian Sugar News in Marathi ‘अथणी-बांबवडे’ची ३२०० प्रमाणे बिले जमा : कार्यकारी संचालक योगेश पाटील
Recent Posts
Daily Sugar Market Update By Vizzie – 25/10/2025
ChiniMandi, Mumbai: 25th Oct 2025
Domestic Market
Steady to weak sentiment witnessed in domestic sugar prices
After remaining stable for the past five to six sessions, domestic...
अफ़ग़ानिस्तान के साथ सीमा संघर्ष ने खाद्य आपूर्ति को अवरुद्ध कर दिया और पाकिस्तान...
मुजफ्फराबाद : पाकिस्तान और अफगानिस्तान के बीच बिगड़ते संघर्ष ने दोनों देशों की साझा सीमाओं के पार फलों और सब्जियों की आवाजाही को बुरी...
Sugar mills in Marathwada must pay farmers a minimum of Rs 3,500 per tonne...
Swabhimani Shetkari Sanghatna leader Raju Shetti on Saturday called on sugar mills in Marathwada to pay farmers a minimum of Rs.3,500 per tonne for...
चीनी मिलों ने इंडेंट जारी कर दिया; 10 नवंबर तक संचालित होगी मिलें
मुरादाबाद (उत्तर प्रदेश) :10 नवंबर तक तीनों चीनी मिलों में गन्ना पेराई शुरू होगी, और इसके लिए चीनी मिलों ने इंडेंट जारी कर दिया...
कोल्हापूर : दत्त दालमिया साखर कारखान्याचे बारा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
कोल्हापूर : आसुर्ले पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर) साखर कारखान्याचा चौदावा गळीत हंगाम शुभारंभ कारखान्याचे युनिट हेड संतोष कुंभार, पत्नी जयश्री...
कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या गाळप हंगामात पावसासह ऊस दराचा अडथळा शक्य
कोल्हापूर : जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर बॉयलर पेटवला आणि दिवाळीत उसाची मोळी गव्हाणीत टाकली आहे. माजी खासदार संजय मंडलिक यांनी प्रतिटन ३,४१०...
Moradabad: Sugar mills to begin operations by November 10
Kanth, Moradabad (UP): In sugar season 2025–26, crushing operations at all three sugar mills in the region will begin by November 10. The mills...











