अहिल्यानगर : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन, १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित

अहिल्यानगर : प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये यंदा बारा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून हंगाम यशस्वी करायचा आहे, अशी घोषणा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करावा लागेल. केंद्र व राज्य सरकारच्या साखर धोरणामुळे सहकारी साखर कारखानदारीला मोठा आर्थिक आधार मिळाला. यंदा पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. दुष्काळी परिस्थिती, घटलेले ऊस उत्पादन आणि पाणीटंचाई यावर आपल्याला मात करायची आहे, असे विखे-पाटील म्हणाले.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे-पाटील म्हणाले की, कामगारांनी परिश्रम घेऊन कारखाना गळितासाठी सज्ज केला. अहिल्यानगर जिल्ह्यात उच्चांकी गाळप आणि उच्चांकी साखर उतारा देणारा कारखाना म्हणून प्रवरा कारखान्याची अग्रगण्य कामगिरी राहावी, या दृष्टीने नियोजन केले जात आहे. कार्यक्रमाला माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, उपाध्यक्ष सोपान शिरसाठ, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, कैलास तांबे, उपसभापती अण्णासाहेब कडू, ट्रक वाहतूक संस्थेचे उपाध्यक्ष सुनील जाधव, अध्यक्ष मकरंद गुणे, उपाध्यक्ष विजय लगड, शांतिनाथ आहेर आणि कार्यकारी संचालक महेश कोनापुरे आदींसह सभासद व उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here