सांगली : विश्वासराव नाईक कारखान्यातर्फे शेतकऱ्यांना व्हीएसआयमध्ये ‘ज्ञानयाग’ ऊस शेती प्रशिक्षण

सांगली : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यातर्फे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) येथे ‘ज्ञानयाग’ या ऊस शेती प्रशिक्षणासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील चौदा शेतकरी रवाना झाले. शेतकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचे पूजन विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष व विश्वास कारखान्याचे संचालक विराज नाईक यांच्या हस्ते झाले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा फायदा करून शेतकऱ्यांना ऊस शेतीमधील जादा उत्पादन घेऊन आर्थिक फायदा करून घ्यावा, असे प्रतिपादन नाईक यांनी यावेळी केले. कार्यकारी संचालक अमोल पाटील व शेती अधिकारी ए. ए. पाटील प्रमुख उपस्थित होते.

या प्रशिक्षणात शेतकरी आनंदराव शिराळकर, राजाराम धस, पंडित निकम, संपत पाटील, शंकर पाटील, वसंत साळुंखे, विश्वास पायमल, संभाजी पाटील, बाबासो पाटील, दीपक शेटे, प्रकाश नांगरे, गोरक्ष पवार, तुकाराम चौगुले, ओमकार निकम आदी सहभागी झाले आहेत. उप ऊसविकास अधिकारी संदीप पाटील यांच्यासह शेती विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. त्यांनी या शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्यांनी पारंपरिक ऊस शेतीमध्ये बदल करून आधुनिक ऊस वाढीचे तंत्रज्ञान स्वीकारावे असे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here