सोलापूर : लोकशक्ती कारखान्याकडून १५ जानेवारीपर्यंतची ऊस बिले शेतकऱ्यांना अदा – चेअरमन मानसिंग खोराटे

सोलापूर : चालू गळीत हंगामासाठी गाळपासाठी आलेल्या उसाची १ ते १५ जानेवारी या कालावधीतील ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहेत. कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे व व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज खोराटे यांनी ही माहिती दिली. लोकशक्ती कारखान्याने यापूर्वीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत बिलांना विलंब होणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. गाळपासाठी ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना वेळेत सर्व बिले मिळतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ऊस बिले वितरणावेळी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज खोराटे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, कार्यालयीन अधीक्षक विवेक पवार, शेतकी अधिकारी राजाराम पवार, बसवराज निगफोडे, फायनान्स मॅनेजर शिवाजी शिंदे, बाळासाहेब गायकवाड, मुख्य अभियंता सिद्धेश्वर शिंदे, मुख्य केमिस्ट अमोल कुलकर्णी, इलेक्ट्रिकल मॅनेजर अखिल बिटे, सिव्हिल इंजिनिअर संजीव करजगी, इन्स्ट्रुमेंटेशन मॅनेजर उमराणी, स्टोअर इन्चार्ज अमोघ तीर्थे, प्रहेश खडके, सुरक्षा अधिकारी चंद्रकांत राठोड यांच्यासह ऊस तोडणी व वाहतूक ठेकदार उपस्थित होते. शेतकऱ्यांना वेळेत बिले मिळाली तर त्यांच्या आर्थिक गरजा भागतील, या उद्देशाने उसाची बिले प्राधान्याने वितरित करण्यात आली आहेत. कारखान्याचे संचालक मंडळ, सदस्यांसह वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष परिश्रम आणि शेतकऱ्यांच्या साथीमुळे गाळप गतीने सुरू असल्याची माहिती खोराटे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here