लातूर : निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु.) येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखान्याच्या (लिज : ओंकार साखर कारखाना प्रा. लि.) विस्तारीकरणाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे कारखान्याची गाळप क्षमता आता दुप्पट होणार आहे. नवीन १५० केएलपीडी डिस्टिलरी प्रकल्पालाही मंजुरी मिळाल्याने ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला.
माजी मंत्री आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. कारखान्याने सादर केलेल्या विस्तारीकरणाच्या प्रस्तावावर पर्यावरण तज्ज्ञ, मूल्यमापन समिती (ईएसी) आणि केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. १९ फेब्रुवारी रोजी या प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
या विस्तारीकरणामुळे केवळ गाळप वाढणार नाही, तर उपपदार्थाच्या निर्मितीतून कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम होईल. त्याचा थेट फायदा सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. दैनंदिन २५०० मे. टनावरून आता ४८०० मे. टन ऊस गाळप होणार आहे. १५० किलोलीटर प्रति दिन (केएलपीडी) क्षमतेचा असवनी डिस्टिलरी प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यात सी-मोलॅसिस, बी- हेवी मोलॅसिस, उसाचा रस आणि धान्याचा वापर करून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे. नवीन को-जनरेशन एकलाती कार्यान्वित तोर्नल


















