बेळगाव : माजी खासदार अण्णासाहेब जोले यांच्या व माजी मंत्री आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या भागातील ऊस उत्पादक सभासद व बिगर ऊस उत्पादक सभासद यांच्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात येत आहेत. उसासाठी आर्थिक सहकार्य म्हणून पंधरा हजार रुपये बिनव्याजी एकरी अनुदान देण्याची योजना सुरू आहे. त्याचबरोबर रोपे देण्यात येत आहेत तसेच कारखान्याच्या सभासदांच्या मुलांना शिक्षणासाठी सहाय्य धन देण्यात येत आहे. या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन एम. पी. पाटील यांनी केले.
यावेळी एकरी ऊस उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी उसाचे खत व पाणी व्यवस्थापन या विषयावर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विश्वजित पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संचालक प्रकाश शिंदे, आनंदा यादव, तसेच ऊस विकास अधिकारी विश्वजित पाटील फार्मर्स फ्युचर कं. चे सीईओ टीडी खोत सर यांनी उसाचे खत व पाणी व्यवस्थापन, रासायनिक व सेंद्रिय शेती करून जमिनीचा कस सुधारणे व उत्पन्न वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले. चेअरमन पाटील साहेब यांनी कारखान्याचे सभासद, बिगर सभासद, ऊस उत्पादकांना कारखाना राबवत असलेल्या योजनेंचा लाभ घेण्याचे आवाहन केले. के. बी. माने यांनी शेतकऱ्यांना खते, रोपे, ठिबकसाठी एकरी १५००० बिनव्याजी अनुदान घेण्यासाठी संपर्क साधण्याचे सांगितले. यावेळी ए. जी. माने, शाहू जाधव, रणजित माने, सयाजी माने, सिद्धेवर गवंडी, विनोद माने, सोहन खोत, बाळू पुजारी, किसन माळी, सर्जेराव डंगे, रघु कुवाळे, चेतन तेली, अण्णासो वंजाळे, शिवाजी माने, दिलीप पटेकर, शशि पोटले, सुनील माने, अमित कुरणे, पप्पू गवंडी, दादू हेरवाडे, मोहन माळी, गोपाळ माळी, शिवाजी तेली उपस्थित होते.


















