सोलापूर : तडवळ येथील ओंकार पॉवर कॉर्पोरेशन प्रा. लि. युनिट ५ या साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२५- २६च्या सांगता समारंभाचा कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमास साखर कारखान्याचे संचालक ओमराजे बोत्रे-पाटील हे उपस्थित होते. ओंकार शुगरचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या हंगामात कारखान्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चालू गळीत हंगामात कारखाने ६. ८१ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले असून १०.८६ टक्के सरासरी उतारा मिळाला आहे.
ओंकार पॉवर कॉर्पोरेशनच्या युनिट पाचमधील या गळीत हंगामात कारखान्याने ४.४२ कोटी युनिट वीजनिर्मिती केली असून त्यापैकी २. ८० कोटी युनिट वीज निर्यात करण्यात आली आहे, अशी माहिती कारखाना प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. सांगता समारंभाला ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदार कारखान्याचे जनरल मॅनेजर व्ही. एम. गायकवाड यांच्यासह खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


















