बँकिंग कायदा दुरुस्तीचा कोल्हापूर जिल्ह्यातील दिग्गज साखर कारखानदारांना दणका, जिल्हा बँक निवडणुकीसाठी अपात्र

कोल्हापूर : दहा वर्षे अथवा त्याहून अधिक काळ संचालक असलेले कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निम्मे संचालक मंडळ वर्षअखेरीस होणाऱ्या निवडणुकीसाठी अपात्र ठरणार आहे. अपात्र ठरणाऱ्या संचालकांमध्ये जिल्ह्यातील दिग्गज साखर कारखानदारांचा समावेश आहे. त्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे नेत्यांच्या जागी आता वारसदारांना संधी मिळणार आहे. बँकिंग कायदा दुरुस्तीला मान्यता देण्यासाठी राज्य शासनाने भारतीय रिझर्व्ह बँकेला मान्यता दिली आहे. या तरतुदीची अंमलबजावणी जिल्हा बँकेच्या पुढील निवडणुकीपासून होणार आहे.

…या संचालकांना मिळणार पुन्हा संधी

बँकेच्या विद्यमान संचालक मंडळात आमदार अमल महाडिक, अर्जुन आबिटकर, रणजित पाटील, राजेश पी. एन. पाटील, रणवीरसिंह गायकवाड, विजयसिंह माने, स्मिता गवळी आणि श्रुतिका काटकर यांना प्रथमच संधी मिळाली आहे. त्यामुळे या संचालकांना जिल्हा बँकेची निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे.

…बँकेची वर्षाखेरीस निवडणूक

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत जानेवारी २०२७ मध्ये संपणार आहे. त्यामुळे बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला वर्षाखेरीस सुरुवात होणार आहे. साधारणतः बँकेसाठी डिसेंबर २०२६ मध्ये मतदान होण्याची शक्यता आहे.

…या दिग्गज नेत्यांना फटका

मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने, संजय मंडलिक, माजी आमदार राजेश पाटील, राजू आवळे या नेत्यांसह ए. वाय. पाटील, प्रताफ ऊर्फ भैया माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संतोष पाटील आदी नेत्यांना फटका बसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here