बीड : जय भवानी साखर कारखाना यंदा करणार सात लाख टन ऊस गाळप, रोलर पूजन उत्साहात

बीड : जय भवानी सहकारी साखर कारखान्यामध्ये शुक्रवारी (दि. ३१ जुलै) श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड संस्थानचे महंत जनार्धन महाराज आणि संचालक संभाजीराव पवळ यांच्या हस्ते विधीवत रोलर पूजन करण्यात आले. कारखान्याच्या ४४ व्या गळीत हंगामासाठी रोलर पूजन समारंभ मोठ्या उत्साहात झाला. या गळीत हंगामाची सर्व तयारी पूर्ण केली असून, यंदा सात लाख मे. टन ऊस गाळपासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. त्यासाठी आवश्यक ऊसतोडणी व वाहतुकीची यंत्रणा उभारण्यात आली आहे. संबंधित सर्व करार पूर्ण झाले असून पहिल्या हप्त्याचे वितरणही करण्यात आले आहे. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जय भवानीची यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रशासनाने सांगितले की, यंदा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे १३ हजार हेक्टरवर ऊस लागवड झाली असून, सभासदांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची नोंदणी केली आहे. संगणक प्रणालीद्वारे ऊस नोंदणी करण्यात आल्यामुळे त्याच प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने ऊसतोडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी व्हाइस चेअरमन भाऊसाहेब नाटकर, युवा नेते पृथ्वीराज पंडित, बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, माजी उपसभापती विकास सानप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक आतकरे, जालिंदर पिसाळ, गजानन काळे यांच्यासह बाजार समिती, खरेदी-विक्री संघ आणि भवानी अर्बन बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते. जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे व कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप यांनी स्वागत केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here