कोल्हापूर : अथर्व-दौलत साखर कारखान्याची सर्व ऊस बिले जमा – अध्यक्ष मानसिंग खोराटे

कोल्हापूर : अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. संचलित हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याने चालू हंगामातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली. खोराटे म्हणाले, यंदा गळीत हंगामाची २४ फेब्रुवारी रोजी सांगता होऊन ४ लाख ४८ मे. टन इतक्या उसाचे गाळप केले. अथर्व-दौलत साखर कारखान्याची गेल्या सात गळीत हंगामांतील ऊस बिले वेळेत देण्याची परंपरा यावर्षी देखील कायम ठेवून गळीत हंगामातील संपूर्ण ऊस बिले अदा केली आहेत.

अध्यक्ष मानसिंग खोराटे म्हणाले कि, चालू हंगाम अखेरची दि. १ ते २४ फेब्रुवारी २०२६ अखेर शेवटची ८१ हजार ३३६ मेट्रिक टन ऊस बिलाची रु. ३४०० प्रमाणे होणारी रक्कम २७ कोटी ६५ लाख ४२ हजार रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोमवारी (दि. २३) जमा करण्यात आली आहेत. दि. ३१ मार्चच्या अगोदर ऊस बिले जमा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी संचालक विजय पाटील, सीईओ विजय मराठे, फायनान्स मॅनेजर सुनील चव्हाण, पीआरओ दयानंद देवाण, एचआर मॅनेजर अश्रू लाड आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here