कोल्हापूर : अथर्व कंपनी संचालित दौलत साखर कारखान्याच्या २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलर पूजन मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांच्या हस्ते झाले. कारखान्यामार्फत ऊस विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भागातील सर्व ऊस उत्पादकांनी आपला ऊस गाळपासाठी पाठवण्याचे आवाहन केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मराठे यांनी सांगितले की, अथर्व कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे, संचालक पृथ्वीराज खोराटे व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसतोडणी व वाहतूक करार पूर्ण केले असून, संबंधित कंत्राटदारांना आगाऊ रकमेचे वाटपही केले आहे. कारखान्यातील यंत्रसामग्रीची देखभाल व दुरुस्ती अंतिम टप्प्यात असून सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने हंगामासाठी सज्ज आहे. यावेळी विविध विभागांचे अधिकारी विजय पाटील, सुनील चव्हाण, प्रकाश तुपे, सुरेश शिंगटे, दत्तकुमार रक्ताडे, चंद्रशेखर पाच्छापुरे आदी उपस्थित होते.


















