पुणे : जिल्ह्यात १३ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम समाप्त, ऊस उत्पादन घटले

पुणे : यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यात एकूण नऊ सहकारी व सहा खाजगी साखर कारखाने कार्यरत होते. सुमारे चार ते साडेचार महिन्यांपूर्वी गळीत हंगामास सुरुवात झाली होती. हंगामाच्या सुरुवातीला ऊस उपलब्धतेच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गळीत हंगाम उशिरापर्यंत चालेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात कार्यक्षेत्रातील ऊस क्षेत्र घटणे, पाणीटंचाई वाढणे आणि ऊस पुरवठ्यात घट होणे या कारणांमुळे कारखान्यांना हंगाम लवकर आटोपावा लागला आहे. आता हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून १५ साखर कारखान्यांपैकी १३ कारखान्यांचे गाळप आटोपले आहे.

सध्या कार्यरत दोन कारखानेही येत्या काही दिवसांत बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या दि. माळेगाव आणि श्री साई प्रिया शुगर्स लि. हे कारखाने सुरू आहेत. शिरूर तालुक्यातील जातेगाव येथील व्यंकटेश शुगर कारखाना, इंदापूर तालुक्यातील निरा-भीमा, कर्मयोगी शंकरराव पाटील, बारामती अॅग्रो, श्रीनाथ म्हस्कोबा अशा काही कारखान्यांनी मार्च महिन्यातच गळीत हंगाम पूर्ण केला आहे. यंदा ऊस लागवड कमी राहणे, पाणीटंचाईची तीव्रता वाढणे आणि उन्हाचा वाढता चटका यामुळे ऊस पुरवठ्यात मोठी घट झाली असून, गळीत हंगाम अपेक्षेपेक्षा लवकर आटोपला आहे. जिल्ह्यातील काही भागांत अजूनही अल्प प्रमाणात ऊस शिल्लक असला तरी तो गाळण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी टंचाईची झळ अधिक तीव्र होत असून उसासह इतर पिकांनाही त्याचा फटका बसत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here