धाराशिव : जिल्ह्यात गाळप हंगाम अंतिम टप्प्यात, दहा साखर कारखाने झाले बंद, ५० लाख क्विंटल साखर उत्पादन

धाराशिव : यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यातील खासगी आणि सहकारी कारखान्यांमध्ये निकोप स्पर्धा पाहायला मिळाली आहे. यामध्ये रांजणी येथील नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीजने जिल्ह्यात सर्वाधिक ९ लाख ८४ हजार ५० टन ऊस गाळप करून प्रथम क्रमांक पटकावला. साखर उताऱ्याच्या बाबतीत जिल्ह्यातील कारखान्यांनी समाधानकारक कामगिरी केली आहे. गाळप हंगाम पूर्णत्वाकडे झुकला असून २५ मार्चपर्यंतच्या अहवालानुसार, एकूण १४ पैकी १० कारखान्यांचा हंगाम आटोपला आहे. या कारखान्यांनी ६० लाख ९६ हजार १३१ टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. त्यातून ५० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी उतारा: ७.९२ टक्के इतका आहे.

सध्या चार कारखान्यांचे गाळप सुरू आहे. नॅचरल शुगर (रांजणी), लोकमंगल माउली इंडस्ट्रीज (खेड, ता. लोहारा), नृसिंह (इंदापूर), विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना (मुरूम, ता. उमरगा) हे कारखाने अजूनही सुरू आहेत. मार्चअखेरपर्यंत संपूर्ण जिल्ह्याचा गाळप हंगाम अधिकृतपणे संपण्याची शक्यता आहे. गाळपात ‘नॅचरल शुगर’चे वर्चस्व राहिले. कांचेश्वर शुगर (मंगळूर) १०.२५ टक्के उताऱ्यासह आघाडीवर राहिला. तर नॅचरल शुगरने सरासरी ८.७७ टक्के उतारा नोंदवला आहे. कारखाने बंद होऊ लागल्याने गेल्या पाच- सहा महिन्यांपासून शिवारात राबणारे ऊसतोड मजूर आता आपल्या गावी परतू लागले आहेत. ऊस गाळप हंगाम संपल्याने शेतातील गजबज आता कमी झाली असून, उन्हाच्या तीव्रतेसोबतच मजुरांच्या या पाल्यांमधील लगबगही आता ओसरू लागली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

—

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here