सोलापूर : शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित, जयहिंद शुगरकडून ऊस बिलांचे वाटप

सोलापूर : जामगाव येथील ‘जयहिंद शुगर’ला वारंवार निवेदने देऊनही रविवारपर्यंत पेमेंट न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले होते. शेतकऱ्यांनी सोमवारी आंदोलनाचा पवित्रा घेताच कारखाना प्रशासनातील अधिकारी वैभव खर्डे, वाकचौरे आणि शेती अधिकारी भाकरे यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. कारखाना प्रशासनाने तातडीने दखल घेत शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि थकीत देयके वर्ग करण्यास सुरुवात केल्याने हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे. यावेळी दादा चव्हाण, संपत रोडगे, बाळासाहेब शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

जयहिंद शुगरने ऊस बिले न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे कारखान्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी ‘दवंडी आंदोलन’ छेडले. मात्र, कारखाना प्रतिनिधींनी आगामी येत्या ४ ते ५ बँक कामकाजाच्या दिवसांत सर्व शेतकऱ्यांचे उर्वरित पेमेंट पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यांदरम्यान, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ रक्कम जमा झाल्याने तणाव निवळला. आता आकगामी काळात दिलेल्या आश्वासनानुसार मुदतीत ऊस बिले न मिळाल्यास पूर्वसूचना न देता पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल,’ असा इशारा शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके यांनी दिला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here