कोल्हापूर : दत्त दालमिया कारखान्याची आगामी गळीत हंगामाची तयारी, ऊस वाहतूक करार सुरू

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील आसुर्ल-पोर्ले येथील दत्त दालमिया साखर कारखान्याने आगामी २०२६-२७ गाळप हंगामाची तयारी सुरू केली आहे. याबाबत कारखान्याच्या मुख्य शेती कार्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. ऊस उत्पादन वाढीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक तर कारखान्याला गाळप उद्दिष्टांचा टप्पा गाठणे सोयीस्कर होते. यंदा ११ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांसह ऊस वाहतूकदारांनी सहकार्य करण्याची विनंती दत्त-दालमियाचे युनिटहेड संतोष कुंभार यांनी केले.

कारखान्यांमध्ये ऊस तोडणी ओढणी वाहतूक कराराचा प्रारंभ कारखान्याचे युनिटहेड संतोष कुंभार यांच्या हस्ते करण्यात आला. कारखान्याच्या शेती गटाअंतर्गत येणाऱ्या प्रातिनिधिक वाहतूकदार कंत्राटदारांना करार बंच देण्यात आले. गेल्या गळीत हंगामात ऊसतोडणी ओढणीचे काम करताना, जखमी झालेल्या मजुरांना एक लाख ४ हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. कारखान्याचे जनरल मॅनेजर (केन) श्रीधर गोसावी, एचआर मॅनेजर सुहास गुडाळे, असि. सीनिअर मॅनेजर (केन) शिवप्रसाद देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शेती विभागातील केन इन्स्पेक्टर, गटप्रमुख, शेतीमदतनीस, ऊस वाहतूक कंत्राटदार आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here