पुणे : छत्रपती कारखान्याच्या परिसरात अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण

पुणे : श्री छत्रपती कारखाना परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह कारखान्यासमोरून जाणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामाची पाहणी कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी बुधवारी (दि. ८) पाहणी केली. यावेळी संचालक मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित होते. श्री छत्रपती -कारखान्याच्या यार्डातून होणाऱ्या ऊस वाहतुकीला पालखी महामार्गामुळे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, अशा पद्धतीने या कामाचे नियोजन करावे, अशी स्पष्ट सूचना अध्यक्ष जाचक यांनी अधिकाऱ्यांना दिली.

याप्रसंगी छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास गावडे, संचालक शिवाजीराव निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, रामचंद्र निंबाळकर, गणपतराव कदम, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, अशोकराव पाटील, मंथन कांबळे, सतीश देवकाते, तानाजी शिंदे, संतोष मासाळ, निलेश टिळेकर, सुचिता सपकळ, माधुरी राजपुरे, जनरल मॅनेजर हनुमंत करवर, सिव्हिल इंजिनिअर नंदकुमार चांदगुडे, मारुती दरेकर, कामगार नेते युवराज रणवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता शशिकांत तुपे, सौरभ देसाई, विराज आवताडे आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here