पुणे : भीमाशंकर कारखाना देणार ३,६०० रुपयांची पहिली उचल – अध्यक्ष बााळासाहेब बेंडे

पुणे : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच चांगला दर दिलेला आहे. माजी सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यंदाच्या गाळप हंगामात ३६०० रुपये प्रतिटन पहिली उचल देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. कारखान्याने गाळप हंगामात शनिवारअखेर अखेर २,७२,००० टन उसाचे गाळप केले असून २,८१,००० क्विंटल साखर उत्पादन घेऊन सरासरी साखर उतारा १०.५३ टक्के मिळाला आहे असे त्यांनी सांगितले.

अध्यक्ष बेंडे म्हणाले की, चालू गळीत हंगामात सरासरी साखर उताऱ्यानुसार कारखान्याची एफआरपी दर ३२७३.६५ प्रतिटन येत आहे. मात्र ३.६०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय झाला आहे. ही उचल कार्यक्षेत्र व परिसरातून गाळप होणाऱ्या उसासाठी लागू असेल. तर अहिल्यानगर जिल्ह्यामधून पुरवठा होणाऱ्या उसासाठी ३२७४ रुपये प्रतिटन ऊस दर दिला जाईल. पैठण, गेवराई परिसरातून पुरवठा होणाऱ्या उसासाठी ३१०० रुपये प्रतिटन ऊस दर देण्याचा निर्णय घेतलेला आहे. उपाध्यक्ष प्रदीप वळसे-पाटील म्हणाले की, कारखान्याने गाळपाचे योग्य नियोजन केले असल्याने ऊस उत्पादकांचे संपूर्ण उसाचे वेळेत गाळप होण्यास मदत होणार आहे. तरी कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here