देशातील तीन राज्यांत ८५ टक्के साखर उत्पादन, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकची उत्पादनात आघाडी

या तीन राज्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. १५ एप्रिल २०२६ पर्यंत, या तीन राज्यांमध्ये सुमारे २३५ लाख टन साखर उत्पादनासह देशाच्या एकूण साखर उत्पादनापैकी ८५ टक्के उत्पादन झाले. या तीन राज्यात साखर उताऱ्याचा विचार केला तर उत्तर प्रदेश १०.२० टक्के उतारासह आघाडीवर आहे. महाराष्ट्र ९.५० टक्के उतारासह दुसऱ्या क्रमांकावर, तर कर्नाटक ८.६० टक्के उतारासह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

देशात २८६५.२१ लाख टन उसाचे गाळप

ChiniMandi WhatsApp Channel

देशात एकूण २८६५.२१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. एकूण ५४१ साखर कारखान्यांपैकी २१ कारखान्यांमध्ये गाळप सुरू आहे. हंगाम २०२४-२५ मध्ये, ५३४ साखर कारखान्यांनी गाळपात भाग घेतला होता. १५ एप्रिल २०२५ पर्यंत ५२० साखर कारखाने बंद झाले होते. कारखान्यांनी २७१३.८८ लाख टन उसाचे गाळप करून २५४.३० लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. हंगामात देशातील सरासरी साखर उताऱ्याचे प्रमाण ९.५६ टक्के आहे. मागील हंगामात याच कालावधीत सरासरी साखर उताऱ्याचे प्रमाण ९.३७ टक्के होते.

साखर उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी

यंदा साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असून, त्याखालोखाल उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. एनएफसीएसएफच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने आतापर्यंत ९९.२० लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे, तर उत्तर प्रदेशने ८९.२० लाख टन उत्पादन केले आहे. कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकने आतापर्यंत ४७.१५ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गुजरातमध्ये ७.५० लाख टन, आंध्र प्रदेशात ०.७० लाख टन, बिहारमध्ये ५.८० लाख टन, हरियाणात ४.५० लाख टन, मध्य प्रदेशात ४.५० लाख टन, पंजाबमध्ये ४.२५ लाख टन, तामिळनाडूमध्ये ५.३० लाख टन, तेलंगणामध्ये २.०० लाख टन, उत्तराखंडमध्ये २.८५ लाख टन आणि इतर राज्यांमध्ये एकूण ०.९५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here