अहिल्यानगर : श्रीगणेश कारखान्याला डॉ. विखे-पाटील कारखान्याकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान

अहिल्यानगर : श्रीगणेश कारखान्याच्या कराराचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण श्रीगणेश कारखान्याला डॉ. विखे पाटील कारखान्याकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तीन वर्षांपूर्वी श्रीगणेश सहकारी कारखाना निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांनी एकत्र येत विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांना पराभवाचा धक्का दिला होता. या निवडणुकीबरोबरच श्रीगणेश सहकारी साखर कारखाना हा पूर्वीच्या करारातून बाहेर पडला. ‘सरकारनामा’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे कि, श्रीगणेश कारखान्याचा हा करार विखे-पाटील कारखान्याशी होता. याच करारावर विखे पाटील कारखान्याने पुन्हा श्रीगणेश कारखान्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील पहिली सुनावणी उद्या मंगळवारी (ता. 21) होत आहे.

विशेष म्हणजे, श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र राज्य सरकारकडून 74 कोटी रुपयांचे मार्जिन मनी कर्ज देखील मंजूर झाले आहे. असे असताना डॉ. विखे-पाटील कारखान्याकडून श्रीगणेशविरोधात पुन्हा न्यायालयीन लढाई सुरू करत, थेट सर्वोच्च न्यायालयात खेचले आहे. यापूर्वी याच मुद्यावर, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. पुणे जिल्हा न्यायालयात व साखर आयुक्त पुणे यांचे समोर संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here