सांगली : नागेवाडी (ता. खानापूर) येथे भारती शुगर्स अँड फ्यूएल्स प्रायव्हेट लि., कार्यस्थळी गळीत हंगाम २०२६-२७ साठी ऊस तोडणी व वाहतूक कराराचा प्रारंभ झाला. भारती विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र लाड व युवा उद्योजक रोहन लाड, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील व वाहन मालक व तोडणी वाहतूक कंत्राटदार यांच्या हस्ते करार पत्रांचे पूजन करण्यात आले. शेती अधिकारी संजय मोहिते यांनी स्वागत केले. पहिले ११ करार करण्याचा मान मिळालेल्या वाहन मालकांचा राजेंद्र लाड व रोहन लाड यांच्या हस्ते सत्कार झाला.
पाटील म्हणाले, “पाच हजार टन क्षमतेचा प्लांट गाळपासाठी तयार आहे. सक्षम तोडणी व वाहतूक यंत्रणा उभी करणार आहे.” जनरल मॅनेजर विकास सूर्यवंशी, ऊस पुरवठा अधिकारी विशाल पाटील, सुजित मोरे, जितेंद्र डुबल, सूर्यकांत पाटील, वाहन मालक दीपक निकम, शंकर काटकर, संजय इंगळे, संपतराव आरबुने, संतोष पाटील, अधिक कदम, चांगाप्पा पांढरे, नानासाहेब किर्दत, प्रमोद जगताप, किशोर धर्माधिकारी, संतोष पाटील, चंद्रकांत यादव, प्रसाद इंगळे, उमेश लाड, शरद पवार, राहुल मोहिते, हणमंत लाड, महेश लाड, शुभम घोरपडे, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.


















