सांगली : जिल्ह्यात १५ कारखान्यांकडून २१.४५ लाख टन उसाचे गाळप, सोनहिरा कारखाना आघाडीवर

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांसमोर यंदा कमी ऊस टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. यंदा विशेष म्हणजे एकरी टनेज तसेच ऊस गाळप उताऱ्यातही घट आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात उतारा कमीच मिळाला आहे. हंगाम कारखानानिहाय ९० ते ११० दिवस सरासरी ९० दिवस चालणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू होऊन महिना पूर्ण झाला आहे. १५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला असून एका महिन्यात २१.४५ लाख टन उसाचे गाळप आणि २१ लाख २१ हजार ११६ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ९.८९ टक्के आहे. ऊस गाळपात सोनहिरा कारखान्याने आघाडी घेतली आहे.

जिल्ह्यात १० सहकारी आणि ६ खासगी असे १६ साखर कारखाने आहेत. कारखान्यांनी गतीने ऊस गाळप सुरू केले तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दर आंदोलनामुळे पहिली उचल आणि अंतिम दराचा तिढा कायम असल्याने शेतकऱ्यांना कायद्यानुसार मिळणारे पहिले बिलही वेळेत मिळालेले नाही. त्यामुळे ऊस उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे. जिल्ह्यात सोनहिरा कारखान्याने सर्वाधिक २,८९,६९५ टन उसाचे गाळप करून २,९५,२७० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. त्यापाठोपाठ क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्याने २,२९,०५० टन उसाचे गाळप करून २,२७, ६६० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तिप्पेहळ्ळीतील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने ६९,३२५ टन ऊस गाळप करून ६२,३९५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. आरग येथील मोहनराव शिंदे कारखान्याचा साखर उतारा सर्वांत कमी म्हणजे ८.९४ टक्के नोंदविण्यात आला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here