सातारा : किसन-वीर कारखान्याकडून तोडणी वाहतूक करार – हंगाम पूर्ण क्षमतेने चालवण्याची व्हाइस चेअरमन शिंदेंची ग्वाही

सातारा : अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर गळीत हंगाम २०२६-२७ साठी ऊस तोडणी वाहतूक कराराचा प्रारंभ करण्यात आला. सातारा सहकारी शेती औद्योगिक तोडणी व वाहतूक सोसायटीमार्फत प्रातिनिधीक स्वरूपात अविनाश सावंत, गणेश सपकाळ, संग्राम चव्हाण, दीपक जाधवराव, किरण शिंदे, पठाण, बादशाहा इनामदार, अल्पेश बाबर, योगेश शिंगटे, ओंकार मोरे, नाना देवकर, अक्षय पवार, संतोष ढाणे, अधिक ढाणे, अमोल जाधव, केशवराव जाधव, जायकर, सूर्यवंशी या ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी आपले करार केले. कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रमोद शिंदे यांच्या हस्ते व ऊस तोडणी वाहतूक संस्थेचे अध्यक्ष बबनराव साबळे, उपाध्यक्ष अजय कदम व संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया करण्यात आली.

शिंदे म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन, मंत्री मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन, खासदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने गेल्या तीन हंगामामध्ये शेतकरी, ऊस-तोडणी, वाहतुकदारांचा विश्वास पुन्हा मिळवला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीइतके करार करून ती तोडणी यंत्रणा मिळविण्यात यश आले. शेतकऱ्यांचा एक रुपयाही बुडता कामा नये, या भावनेतून संचालक मंडळ काम करीत आहे. स्थानिक वाहतूक कंत्राटदारांनाही आपले करार किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे देण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. संचालक प्रकाश धुरगुडे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, तोडणी वाहतुक संस्थेचे संचालक मानसिंग साबळे, अरविंद कदम, शशिकांत भोईटे, डॉ. उदयसिंह पिसाळ, मॅनेजर बी. आर. सावंत, शेती अधिकारी विठ्ठलराव कदम, ऊस वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here