पुणे : भीमा पाटस कारखान्यावर तीन सदस्यीय प्रशासक समिती नियुक्त, संचालक मंडळाची मुदत ५ जून २०२० रोजी संपुष्टात

पुणे : दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर निवडणूक प्रक्रिया रखडल्याने अखेर कारखान्यावर तीन सदस्यीय प्रशासक समिती नियुक्त केली आहे. याबाबत प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे विभाग यांनी आदेश काढला. कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत ५ जून २०२० रोजी संपुष्टात आली होती. त्यानंतर नव्या निवडणुकीसाठी आवश्यक निधी भरण्याबाबत प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात आल्या.

कारखान्याकडे ४४ हजार ४५७ पात्र सभासद असून, सुमारे ६० लाख १२ हजार ४५७ रुपयांचा निवडणूक निधी भरणे अपेक्षित होते. मात्र, कारखान्याकडून २८ फेब्रुवारी २०२३ रोजी केवळ १० लाख रुपये जमा केले. उर्वरित रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. विविध सुनावण्यांनंतरही निधी न भरल्याने निवडणूक प्रक्रिया पुढे जाऊ शकली नाही. संचालक मंडळाची मुदत संपूनही नवीन समिती अस्तित्वात न आल्याने प्रशासनात पोकळी निर्माण झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. परिणामी कारखान्याचे दैनंदिन कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासक समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here