कोल्हापूर : आंबा घाटात साखर वाहतूक ट्रक उलटून चालक जखमी

कोल्हापूर : कोल्हापूरहून जयगडकडे साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा आंबा घाटात शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. सकाळी ६.१५ च्या सुमारास देवरुख पोलिस ठाणे हद्दीतील आंबा घाटातील दख्खन गावाजवळील धोकादायक वळणावर हा अपघात घडला. समशेर अन्सारी (४०, मूळ रा. झारखंड बिहार) असे गंभीर जखमी ट्रक चालकाचे नाव आहे.

अन्सारी हा आपल्या ताब्यातील ट्रकमधून सुमारे ३१ टन साखर घेऊन कोल्हापूरहून जयगडकडे जात होता. त्याचे घाटातील तीव्र वळणावर ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रकने स्वतःची लेन सोडून मध्यभागी असलेला दुभाजक ओलांडत समोरच्या लेनमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रस्त्यालगत असलेल्या खोल पाण्याच्या चरात जाऊन ट्रक पलटी झाला. या भीषण अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने त्याला तत्काळ साखरपा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here