कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याकडून संपूर्ण उसाचे बिल शेतकऱ्यांना आदा

कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील गाळप झालेल्या संपूर्ण उसाचे बिल शेतकऱ्यांना आदा केले आहे. हंगामात गाळप झालेल्या चार लाख ३२ हजार टनांची १५७ कोटी ९६ लाख एवढी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र कवडे, कार्यकारी संचालक सागर पाटील आणि संचालक मंडळाने दिली.

अध्यक्ष पाटील आणि उपाध्यक्ष कवडे म्हणाले, कसलीही तडजोड न करता शासनाकडून मिळालेल्या कर्जातून शेतकऱ्यांची देणी पूर्ण भागविली आहेत. शेतकऱ्यांना तीन हजार ६५३ प्रतिटन ऊसदर देण्याचा दिलेला शब्द पाळला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून कारखान्याची वाटचाल सुरू आहे. पुढील हंगामात साडेपाच लाखांच्या आसपास गळीत हंगाम झाला, तरच कारखाना सावरू शकणार आहोत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here