सांगली : हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या कार्यालयाला आंदोलकांनी घातले कुलूप

सांगली : हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरू झालेले ठिय्या आंदोलन रविवारीही सुरूच राहिले. संतप्त आंदोलकांनी रात्री वैभव नायकवडी यांच्या साखर कारखान्यातील कार्यालयाला कुलूप घातले. यावेळी सभासद, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, वैभव नायकवडी यांनी आमच्याशी संपर्क साधला. मात्र, ते राजीनामा देत नाहीत, यावर ठाम राहिले. मला आणखी दोन वर्षे संधी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. ही विनंती आम्ही धुडकावून लावल्याचे गौरव नायकवडी यांनी सांगितले.

यावेळी हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी म्हणाले, जिथे पाचशे रुपये लागतात, तिथे पन्नास लाख रुपये घालायची ताकद वैभव नायकवडी यांच्याकडे आहे. त्यामुळे आंदोलन करताना गाफील राहू नका. तर गौरव नायकवडी म्हणाले की, ज्येष्ठ नेते किरण नायकवडी आठ दिवस आंदोलन करत आहेत. याचे त्यांना भान असेल तर त्यांनी पुढे येऊन राजीनामा द्यावा आणि कर्ज फेडावे. मात्र ते सुधारण्याची शक्यता नाही. केदार नायकवडी यांनी कारखान्याचे कामकाज नागनाथअण्णा नायकवडी यांच्या विचारांनी व्हावे, ही आमची भूमिका आहे. वैभव नायकवडी ऐकत नाहीत तर वेगळा विचार करावा लागेल. त्यांच्यासह संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here