सातारा : कृष्णा कारखान्याकडून वाकुर्डे योजनेच्या थकीत वीज बिलापोटी तीन लाख रुपयांचा भरणा

सातारा : उंडाळे विभागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. वाकुर्डे पाणी योजनेच्या थकीत वीजबिलापोटी ३ लाख रुपयांचा धनादेश वाळवा तालुक्यातील पेठ नाका येथील योजनेच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. योजनेचे वीज बिल थकीत असल्याने या भागातील लोकांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर वाकुर्डे योजनेचे थकीत वीज बिल कृष्णा कारखान्यामार्फत अदा करावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत सुरेश भोसले व आमदार अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार थकीत विजबिलाचा ३ लाखांचा धनादेश वारणा कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार व सहाय्यक अभियंता विजय आंबोळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

कराड तालुक्यात वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी व पिण्यासाठी काले, ओंडोशी, नांदगाव, मनव, उंडाळे, शेवाळवाडी, जिंती, टाळगाव, घोगाव, येणपे, वाठार, झुजारवाडी, पवारवाडी, चोरमारवाडी, माटेकरवाडी, येळगाव, गोटेवाडी, म्हारुगडेवाडी, आकाईवाडी, साळशिरंबे या गावातील ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, वीज बिल थकीत असल्याने अनेकवेळा अडचणींना सामोरे जावे लागते. यंदा तसे होऊ नये यासाठी डॉ. सुरेश भोसले यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत डॉ. सुरेश भोसले व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार मानले. यावेळी कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, नांदगावचे सरपंच हंबीरराव पाटील, सवादेचे माजी सरपंच संजय शेवाळे, पंकज पाटील, तानाजी चौरे, एन. डी. शेवाळे, दत्तात्रय साळुंखे, दिलीप सूर्यवंशी, प्रवीण साळुंखे, सुमित शेवाळे, अशोक पाटील, सागर जाधव, धनाजी देशमुख, भीमराव पाटील, दिनकर पाटील आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here